ENVIS Centre, Ministry of Environment & Forest, Govt. of India

Printed Date: Friday, March 29, 2024

Latest News

Archive

PBR course

 

 

Certificate Course in Development of PBR (People’s Biodiversity Register) and management of BMCs (Biodiversity Management Committees) under Biological Diversity Act 2002

 

India, being the second most populous country in the world, is bestowed with a large working population and can take advantage of this demographic dividend. However, high drop-out rates from school, coupled with poor vocational skills, hinder the process of reaping this dividend. Between demand and supply, there exists a gap of skill sets, both cognitive and practical, at various levels in the environment/forest sectors in India.

 

Green skills are crucial for making a transition from a conventional energy-using and emissions-intensive economy to cleaner and greener production and service patterns. Green skills prepare people for sustainable jobs that contribute to preserving or restoring the quality of the environment, simultaneously improving social equity and enhancing the overall quality of life. Realizing the demand for green-skilled youth, the Green Skill Development Programme (GSDP) was conceptualized and developed by the Ministry of Environment, Forest and Climate Change (MoEF&CC), Government of India.

 

BNHS ENVIS Centre on Avian Ecology, established under the Environmental Information System (ENVIS) programme of the Ministry of Environment, Forest and Climate Change (MoEF&CC) in the area of Avian Ecology, is organizing a 20 days training programme in association with the Maharashtra State Biodiversity Board, on “Certificate Course in Development of PBR and management of BMCs under Biological Diversity Act 2002” from in Maharashtra.

 

This technical training course is designed for youth in rural areas where local communities depend heavily on natural bio-resources. The principal objective of this course is to train youth to develop a comprehensive and good quality People’s Biodiversity Register (PBR) at the village panchayat level, which can be used effectively in sustainable development of the local community and village panchayat. During PBR documentation, special attention will be paid towards:

 

1. How to conduct interviews of locals who have information about the local biodiversity.

2. How to collect significant traditional knowledge on biodiversity at the local level.

3. How to make Biodiversity Management Committees (BMC) functional through the activities of PBR.

 

The course will provide additional training related to long-term management of bio-resources in the course area, its sustainable utilization and biodiversity-based sustainable development.

 

Thus, to cover these areas, training on the following topics will be provided with practical knowledge as follows:

1. Maintaining the BMC accounts register.

2. Maintaining and managing details of bio-resources at the village level.

3. Establishment of coordination between block level and village level committees.

4.Implementation of ABS (Access and Benefit Sharing) mechanism, establishment for biodiversity heritage sites.

5. Developing ecotourism.

6.Development of Biodiversity Management Plan for village panchayat.

 

In addition, for the personal development of the participants, special training will be provided on the following topics:

1. Identifying plants, animals, insects, and other wildlife in one’s area.

2. Understanding about rare and threatened plant / animal species. 

3. Coordinating with acts like PESA and FRA.

4. Ways to use the provisions of BD Act effectively at the local level for the conservation and protection of biodiversity.

 

At the end of this training the participant should be able to do PBR independently anywhere in Maharashtra, and also function as a guide for eco-tourism programmes, based on his/her personal capacity.

 

Qualification: Anyone residing in Maharashtra, with educational qualification up to Class 10 or 12 and unemployed. The candidate must be fluent in reading, writing, and speaking in Marathi. Drop-outs may also be considered for the training programme, subject to clearing the interview. Preference and relaxation in qualification will be given to tribal candidates who stay near eco-tourism destinations or whose livelihood has been affected by sanctuaries.

 

Course Fees: This course is free of cost, and includes accommodation, food and local travel.

 

Course duration: 20 Days.

 

Training location: The announced training course will be conducted in Maharashtra. The venue of this course will be informed to the selected course participants via email/message.

 

Course training language: Marathi. Study material will be provided in Marathi.

 

Selection criteria: Interview

 

Candidates must upload their resumes on the online GSDP Portal. The link is given below:

 

http://www.gsdp-envis.gov.in/Default3.aspx

 

Please note that the last date to submit resumes on the GSDP portal is December 20, 2019.

 

Total number of seats available: 20

 

For details contact us at: Bombay Natural History Society, Hornbill House, Dr. Salim Ali Chowk, Opp. Lion Gate, Shaheed Bhagat Singh Road, Mumbai 400 001, Maharashtra.  Landline: 022-22821811, Email id: envis@bnhs.org 

 

 


जैविक विविधता कायदा २००२ अंतर्गत पीबीआर (जैवविविधता नोंद वही) आणि बीएमसीचे प्रबंधन (जैवविविधता व्यवस्थापन समित्या) प्रमाणपत्र अभ्यासक्रम.

 

जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताला गणले जाते. आपल्या भागात कमी व्यावसायिक कौशल्यासह अर्धवट शाळा सोडून देणाऱ्यांचे प्रमाण सुद्धा बरेच आहे. अशा घटकातील व्यक्तींना किमान काही कौशल्य प्राप्त करून देण्यात आले तर त्यांना त्याचा उपयोग विविध स्तरावर करता येऊ शकतो.

 

हरित कौशल्य अर्थात Green skills म्हणजे निसर्गाच्या संदर्भातील काही कौशल्य प्रशिक्षण जर युवकांना देण्यात आले तर त्या कौशल्याचा फायदा पारंपारिक ऊर्जा-वापर आणि पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी केला जाऊ शकतो. हरित कौशल्य युक्त लोकांमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या नोकरीच्या किंवा व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात ज्यामुळे पर्यावरणाचे उत्तम जतन करणे किंवा त्याचे संधारण तसेच सामाजिक समानता वाढविण्यासाठी शाश्वतपणे काम करता येऊ शकेल. हरित कौशल्यासाठी (Green skills) युवकांची मागणी लक्षात घेता, ग्रीन स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम (GSDP) हा संकल्पित आणि विकसित करण्यात आला आहे, जो भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल (MoEF&CC) मंत्रालयामार्फत संपूर्ण भारतभर राबवला जात आहे.

 

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS) ENVIS Centre on Avian Ecology हे केंद्र केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल (MoEF&CC), नवी दिल्ली, भारत सरकार यांच्या, पर्यावरण माहिती केंद्राअंतर्गत स्थापन करण्यात आलेले आहे.

 

BNHS-ENVIS च्या या विभागातर्फे GSDP च्या अंतर्गत व महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्या सहकार्याने महाराष्ट्रामध्ये वीस दिवसांचे, "जैविक विविधता कायदा २००२ अंतर्गत पीबीआर लोकजैवविविधता नोंद वही तयार करणे आणि जैवविविधता व्यवस्थापन समित्यांचे प्रबंधन, प्रमाणपत्र प्रशिक्षण (अभ्यासक्रम) हे येणाऱ्या २०२० मध्ये जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सुरु होईल आणि फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण होईल. प्रशिक्षण हे महाराष्ट्रामध्ये होणार असून अभ्यासक्रमाचे ठिकाण निवड झालेल्या उमेदवारांना कळवले जाईल. हा अभ्यासक्रम MoEF&CC नवी दिल्ली, भारत सरकार च्या पर्यावरण माहिती केंद्राअंतर्गत GSDP मानदंडानुसार तयार करण्यात आलेला आहे.

 

हे तांत्रिक प्रशिक्षण मुख्यत्वे ग्रामीण भागातील नैसर्गिक जैव-स्रोतांवर/ संसाधनांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असणाऱ्या तरुणांसाठी तयार करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण पंचायत स्तरावर एक व्यापक आणि चांगली गुणवत्ता असलेल्या लोकजैवविविधता नोंद वही (PBR) विकसित करण्यासाठी तरुणांना प्रशिक्षित करणे आहे, ज्याचा वापर स्थानिक समुदायातील आणि ग्रामीण पंचायतीच्या शाश्वत विकासासाठी प्रभावीपणे करता येऊ शकतो. जैवविविधता नोंद वही दस्तऐवज करण्यासाठी खालील बाबींकडे विशेष लक्ष दिले जाईल:

१) स्थानिक पातळीवर जैवविविधतेविषयी मुलाखत कशी घ्यावी?

२) स्थानिक पातळीवर जैवविविधतेवरील महत्त्वपूर्ण पारंपारिक ज्ञान कसे गोळा करावे?

३) जैवविविधता व्यवस्थापन समित्या (BMC) जैवविविधता नोंद वही तयार करण्यासाठी कसे कार्य करतात?

 

अभ्यासक्रमात जैव-संसाधनांच्या दीर्घकालीन व्यवस्थापनाशी संबंधित अतिरिक्त प्रशिक्षण प्रदान केले जाईल, त्याचा शाश्वत वापर आणि जैवविविधता-आधारित शाश्वत विकास कसा करता येईल त्यासंदर्भातसुद्धा मार्गदर्शन करण्यात येईल.

या क्षेत्रांना संरक्षित करण्यासाठी पुढील विषयावरील प्रशिक्षण खालीलप्रमाणे व्यावहारिक ज्ञान प्रदान केले जाईल:

१) जैवविविधता व्यवस्थापन समित्यांच्या संदर्भातील (BMC) बॅंक खात्यांच्या नोंदी कशा ठेवाव्यात?

२) ग्रामस्तरीय जैवविविधता संदर्भातील तपशील कसे नोंद करुन ठेवावे आणि त्याचे व्यवस्थापन कसे करावे?

३). ग्रामस्तरीय समित्यांमधील समन्वय स्थापन करणे.

४) जैविक संसाधनांच्या व्यावसायिक वापरातुन मिळणाऱ्या फायद्याचे समन्यायी वाटपतंत्र व त्याची अंमलबजावणी, जैवविविधता वारसा स्थळ या संदर्भात माहिती दिली जाईल.

५) इको-टुरिझम किंवा जैवविविधता वारसा स्थळाची स्थापना.

६) ग्रामपंचायतीसाठी जैवविविधता व्यवस्थापन योजना विकसित करणे.

 

या व्यतिरिक्त, सहभागींच्या वैयक्तिक विकासासाठी खालील विषयावर विशेष प्रशिक्षण दिले जाईल:

१) त्यांच्या भागात वनस्पती, प्राणी, कीटक आणि इतर वन्यजीव कसे ओळखायचे.

२) दुर्मिळ आणि धोक्यात असलेल्या वनस्पती / प्राणी प्रजातींबद्दल समजून घेणे.

३) PESA(पंचायत विस्तार ते अनुसूचित क्षेत्र) आणि वन हक्क कायदा बद्दल माहिती देण्यात येईल.

४) स्थानिक पातळीवर संरक्षण आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठी जैविक विविधता कायद्याचा प्रभावीपणे वापर.

 

या प्रशिक्षणाच्या शेवटी सहभागी महाराष्ट्रात कोठेही जैवविविधता नोंद वही स्वतंत्रपणे करण्यास सक्षम होईल तसेच इको-टुरिझम मार्गदर्शक म्हणून काम करू शकेल.

 

शैक्षणिक पात्रता:

१) किमान १० वी/१२ वी/मुलाखतीत उत्तीर्ण.

२) प्रशिक्षणार्थी मराठी उत्तम वाचण्यास, लिहिण्यास आणि बोलण्यास सक्षम असेल.

३) आदिवासी बहुल भागातील जैवविविधतेच्या संरक्षण व संवर्धन करीत असलेल्या लोकांना प्राधान्य देण्यात येईल.

 

अभ्यासक्रम शुल्क: हा अभ्यासक्रम विनामूल्य आहे. निवास, भोजन आणि स्थानिक प्रवास यात समाविष्ट आहे.

 

अभ्यासक्रम कालावधी: २० दिवस

 

प्रशिक्षण स्थळ:- महाराष्ट्र (अभ्यासक्रमाचे ठिकाण निवड झालेल्या उमेदवारांना कळवले जाईल)

 

प्रशिक्षण भाषा: मराठी. मराठीमध्ये अभ्यास सामुग्री दिली जाईल.

 

निवड निकषः मुलाखत

 

मुलाखत व शर्ती - अटी यावर

अटी

१. प्रत्येक उमेदवाराने आपण २० दिवस निवासी राहणार असल्याचे लेखी द्यावे लागेल.

२. २० दिवसांचे प्रशिक्षण वर्ग पूर्ण न केल्यास, त्या उमेदवारास सदर कार्यशाळा पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देता येणार नाही.

३. प्रत्येक उमेदवारास वैद्यकीय दृष्ट्या उत्तम असल्याचे प्रमाणपत्र आणावे लागेल.

४. संस्थेच्या वतीने जर कोणी येणार असेल तर संस्थेचे पत्र सोबत द्यावे परंतु निवड प्रक्रिया ही नमूद केल्याप्रमाणे असेल.

५. प्रशिक्षण दरम्यान प्रत्यक्ष गावात जाऊन स्थानिक लोकांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत. तरी सर्व इच्छुक प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी यात सहभागी होणे बाबत पूर्ण तयारी असल्याचे नमूद करणे आवश्यक असेल.

 

उपलब्ध एकूण जागाः 20

 

इच्छुक व्यक्तीने आपला अर्ज GSDP या पोर्टलवर जाऊन भरावा त्यासाठी दिलेल्या लिंक च्या माध्यमातून अर्ज भरता येईल.

 

http://www.gsdp-envis.gov.in/Default3.aspx

 

अधिक माहितीसाठी खालील पत्यावर संपर्क साधावा:- बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी हॉर्नबिल हाऊस, डॉ. सलीम अली चौक, शहीद भगत सिंग रोड, मुंबई 400 001, महाराष्ट्र. संपर्क: 022-22821811, ईमेल: envis@bnhs.org