पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र


Environmental Information System (ENVIS) - पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र
पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र हा वन आणि पर्यावरण मंत्रलय, भारत सरकारचा एक महत्वाचा प्रकल्प आहे. अशा ७८ विविध पर्यावर्णीय विषयांच्या केंद्रांचे जाळे आपल्या देशात असून त्यांचे मध्यवर्तीय केंद्र - भारत सरकार, नवी दिल्ली येथे अस्थापित आहे. हे मध्यवर्तीय केंद्र -
INFOTERRA (International Information System on Environment -  जागतिक पर्यावरण माहिती प्रणाली) ह्या संयुक्त राष्ट्र पर्यावरण संरक्षण विभागातील पर्यावरण माहिती देखरेख करणारे प्रादेशिक केंद्र म्हणून कार्यरत आहे.

बीएनएचएस पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र
बीएनएचएस पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र हे पक्षी अभ्यासाविषयीचे मध्यवर्ती केंद्र म्हणून काम पाहते. डॉ. सलिम अलींच्या जन्मशताब्दीची सुवर्ण संधी साधून १९९६ साली भारत सरकारने पक्षी परिस्थितिकी या विषयाकरिता पर्यावरण माहिती प्रणाली केंद्र म्हणून निवड केली. ह्या केंद्राचे उद्घाटन श्री. एन. आर. कृष्णन, सचिव, वन आणि पर्यावरण मंत्रलय, यांच्यातर्फ़े १८ जून १९९६ साली झाले.

डॉ. सलिम अलींसारख्या महान विभूतींमुळे असणारी बीएनएचएसची ओळख खालीलप्रमाणे अधोरेखित होते:


१.  भारतीय पक्षी आणि निसर्ग संवर्धन ह्या विषयांच्या अभ्यासाचे प्रणेते.
२.  त्यांचे पक्षी अभ्यासावरचे सर्वोत्कृष्ट पुस्तक ’बुक ऑफ़ इंडियन बर्डस़’.
३.  ’हँड्बुक ऑफ़ बर्ड्स़ ऑफ़ इंडिया अँड पाकिस्तान’ ह्या विषयावर डॉ. एस.डी. रिपले यांच्या सोबत प्रकाशित केलेली पुस्तके.

त्यामुळे पक्षी परिस्थितिकी ह्या विषयाकरिता बीएनएचएसची झालेली निवड सहज समजण्यासारखी आहे, कारण ह्या संस्थेची नाळ ह्या त्या कारणाने पक्षी, प्रकृती विज्ञान आणि निसर्ग संवर्धन ह्या विषयांशी जोडलेले आहे. संस्थेचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ठ्य म्हणजे संस्थेचे अग्रगण्य वार्तापत्र ‘जर्नल ऑफ़ बॉम्बे नॅच्युरल हिस्ट्री सोसायटी’ जे सन १८८६ पासून भारतीय उपखंडातील परिस्थितिकी या विषयावर अव्याहतपणे प्रकाशित केले जाते. या व्यतिरिक्त संस्थेचे भव्य आणि सुसज्ज ग्रंथालय, शास्त्रीय प्रकाशने आणि विविध प्रजातींच्या नमून्यांचे संग्रह, ज्यातले काही दुर्मिळ आणि एका शतकापेक्षा जुने आहेत. भारतातील जैवविविधतेवर काम करणाऱ्या अनुभवी शास्त्रज्ञांची फ़ौज ही आणखी एक जमेची बाजू.

केंद्राची उद्दिष्टे
मुख्य उद्दिष्ट म्हणजे भारतीय पक्ष्यांविषयी माहिती गोळा करणे, संकलन करणे, एकत्रित करणे आणि समाजातील विविध स्तरीय लोक, जसे प्रशासकीय सेवा अधिकारी, योजना अधिकारी, संशोधक आणि इतर अशांपर्यंत पोचवणे.


इतर उद्दिष्टे
१.  प्रकाशित झालेल्या शास्त्रीय आणि इतर साहित्यातून पक्षी परिस्थितिकी ह्या विषयाची संदर्भसूची बनवणे.
२.  पक्षी परिस्थितिकी ह्या विषयावरचे विविध माहिती संग्रह विकसित करणे.
३.  पक्षी परिस्थितिकी ह्या विषयावर वार्तापत्र करणे.
४.  पक्ष्यांवर अभ्यास करणाऱ्या इतर स्रोतांची माहिती संकलित करणे.

ब्युसेरॉस वार्तापत्र
बीएनएचएस माहिती प्रणाली केंद्राच्या उत्घाटनपर अंकापासून या वार्तापत्राला 'ब्युसेरॉस' हे नाव देण्यात आले. ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी ’ब्युसेरॉस’ हे मोठा भारतीय धनेश ह्या पक्ष्याच्या शास्त्रीय नावापैकी प्रथम नाव आहे. मोठा धनेश हे बीएनएचएसचे बोधचिन्ह आहे आणि त्याच्या ’हॉर्नबिल’ ह्या इंग्रजी नावाने आगोदर पासूनच एक वार्तापत्र प्रकाशित होते, म्हणून ह्याच शुभदायक पक्ष्याचे शास्त्रीय नाव ह्या वार्तापत्राला देण्याचे ठरले. शेवटी धनेश पक्षीच पण वेगळ्या नावाने संस्थेशी निगडित राहिला हे महत्वाचे.

 

मागचे अंक येथून निवडा :

नविन ब्युसेरॉस अंक येथे उप्लब्ध आहे

 

महिती संग्रह

संदर्भग्रंथ यादी

सारांश

राज्य आणि संघराज्यातील पक्ष्यांची याद

भारतातील विशिष्ट क्षेत्रीय पक्षी

भारतातील संकटग्रस्त पक्षी

महत्वाची पक्षी स्थळ

 

© 2008 copyright @ bnhsenvis.nic.in