|
गिधाडांचे
कृत्रिम प्रजनन - बीएनएचएसचा एक महत्वाकांक्षी
प्रकल्प
झपाट्याने कमी
होणाऱ्या गिधाडांची संख्या आणि त्यांच्या संवर्धन प्रकल्पाची सुरुवात -
१. भारतातील गिधाडांचे एकुण ९ जातींपैकी
‘जिप्स’ प्रजातींच्या ७ जातींच्या
संख्येमध्ये मागच्या २ दशकात सतत मोठी घट आढळून आली.
२. सुमारे १९९०च्या दशकात केवलादेव नॅशनल पार्क मध्ये गिधाडांची संख्या कमी
होत आहे असे बीएनएचएसच्या संशोधकांना आढळले.
३. वन आणि पर्यावरण मंत्रालय, यू.एस. फ़िश अँड वाइल्डलाईफ़ सर्व्हिसेस आणि
इतर संस्थांच्या मदतीने बीएनएचएसच्या संशोधकांनी ८ गिधाडांच्या खालावणाऱ्या
संख्येचा सतत पाठपुरावा केला.
५. २००४ मध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासतून असा निष्कर्ष निघाला कि
जनावरांना देण्यात येणाऱ्या डायक्लोफ़िनॅक ह्या वेदनाशामक औषधामुळे
गिधाडांवर परिणाम झाला आहे.
गिधाडांचा शास्त्रीय अभ्यास:
१. ‘जिप्स’ जातींच्या गिधाडांच्या घरट्यांची मोजणी करणे.
२. स्वयंसेवकांच्या सहाय्याने गिधाडांच्या वसतिस्थानांचे निरिक्षण
करणे.
३. गिधाडांचे हिवाळी सर्वेक्षण करणे.
४. डायक्लोफ़िनॅक ह्या औषधावर पर्याय असणाऱ्या ’मेलॉक्सिकॅम’ औषधाच्या
सुरक्षेसंबंधी तपासणी करणे.
गिधाडांचे कृत्रिम प्रजनन प्रकल्प:
गिधाडांच्या पुनःप्राप्तीच्या २००४ सालच्या आराखड्यानुसार गिधाडांचे
कृत्रिम प्रजनन हा महत्वाचा उद्देश ठरला. त्यातील महत्वाची सूचना अशी होती
कि भारतात कमीतकमी ३ गिधाड कृत्रिम प्रजनन केंद्र युद्ध पातळीवर कार्यरत
व्हावीत आणि दक्षिण आशियात एकुण ६ जातींचे कृत्रिम प्रजनन केले जाईल.
सध्या कार्यरत असलेली भारतातील केंद्रे:
१. पिंजोर, हरयाणा
२. राजाभातखावा, पश्चिम बंगाल
३. राणी, आसाम
अर्थ सहाय्यक -
वन आणि पर्यावरण मंत्रालय, हरयाणा वन विभाग, डार्विन इनिशिएटिव, रॉयल
सोसायटी फ़ॉर प्रोटेक्शन ऑफ़ बर्डस (आर.एस.पी.बी.), झूलॉजिकल सर्वे ऑफ़ लंडन,
नॅशनल बर्डस ऑफ़ प्रे, ट्रस्ट.
संपर्क:
डॉ. विभू प्रकाश (मुख्य संचालक)
कार्यालय: बी-३, फ़ॉरेस्ट कँप्लेक्स,
पिंजोर - १३४१०२, हरयाणा
भ्रमणध्वनी: ०१७३३-२३२९२४, २४०३०४
घर: एफ़-२३, एचएमटी कॉलनी
पिंजोर - १३४१०१, हरयाणा
भ्रमणध्वनी: ०१७३३-३६४४२६, ०९८१६०७६४६९
ई-मेल: jatayuprakash@sify.com |