महत्वाची पक्षी स्थळ

राज्य आणि संघराज्याप्रमाणे महत्वाच्या पक्षी स्थळांची याद

 

या प्रकल्पाची महत्वाची उद्दिष्टे:
१.  वन्य पक्ष्यांच्या भौगोलिक आणि नैसर्गिक अधिवासांचा शोध घेणे.
२.  महत्वाच्या पक्षी स्थळांचे एक व्यापक जाळे निर्माण करणे.
३.  पक्ष्यांच्या संवर्धन व्यवस्थापनांच्या धोरणांची योग्य अंमलबजावणी होते कि नाही हे पाहणे.
४.  सर्व महत्वाच्या पक्ष्यांच्या अधिवासांचा दस्तऐवज बनवणे.
५.  महत्वाच्या पक्षी स्थळांबद्दल जनजागृती मोहिम राबवणे.

महत्वाच्या पक्षी स्थळांबद्दल जागतिक परिमाणे:
जी स्थळे खालील मापदंड पार करतात त्यांना महत्वाच्या पक्षी स्थळे म्हणून मान्यता दिली.
ए १: जागतिक संकटग्रस्त पाक्ष्यांचा अधिवास.
ए २: मर्यादित क्षेत्र अधिवासातील पक्ष्यांचा वावर.
ए ३: परिस्थितिकीय मर्यादित प्रजातींचा वावर.
ए ४: एखाद्या ठिकाणी एकत्र जमलेल्या पक्ष्यांची संख्या जर खालील मानके पार करत असेल ते स्थळ:
   १.  जैवभौगोलिक पाणथळ पक्ष्यांच्या प्रजातीच्या संख्येपैकी जर पक्ष्यांची संख्या > १% आढळत असेल तर.
   २.  समुद्री अथवा जमीनीवरील पक्ष्यांच्या संख्येपैकी जर पक्ष्यांची संख्या > १% आढळत असेल तर.
   ३.  जर एखाद्या स्थळी नियमितपणे > २०,००० पाणपक्षी वा > १०,००० समुद्र पक्ष्यांच्या एक किंवा त्यापेक्षा जास्त प्रजातींच्या जोड्या आढळत असतील तर.
   ४.  माहित असलेल्या ठराविक सीमा ओलांडून आढळणारी स्थलांतरित पक्ष्यांची लक्षणीय संख्या.

 

Reference:

Jhunjhunwala, S., A.R. Rahmani, F. Ishtiaq, Z. Islam, (2001). The Important Bird Areas Programme in India. Buceros Vol. 6 (2): 50 pp.