विशिष्ट क्षेत्रीय पक्ष्यांची यादी
विशिष्ट क्षेत्रीय पक्षी
ज्या प्रजातीचे पक्षी एखाद्या विशिष्ट
प्रदेशात विकसित होतात आणि त्यांचा वावर
त्या विशिष्ट भूभागापुरताच मर्यादित राहतो
अशा पक्ष्यांना विशिष्ट क्षेत्रीय पक्षी
असे म्हणतात.
पुरातन काळातल्या प्रजाती विकसित
होण्याच्या घटना (उदा. स्थळ, काळ आणि वेळ)
आणि त्या प्रजातीच्या सभोवतालच्या
वातावरणीय घटकांना दिला
जाणारा प्रतिसाद हे
विशिष्ट क्षेत्रीय पक्षी प्रजातींच्या
उत्क्रांतीत महत्वाच्या भुमिका पार पाडतात.
दक्षिण आशियात जवळजवळ २१८ जातींची
विशिष्ट क्षेत्रीय पक्षी आढळतात (रासमुस्सेन
आणि अँडरटन, २००५). झूलॉजिकल सर्वे ऑफ़
इंडिया तर्फ़े प्रकाशित केलेल्या विशिष्ट
क्षेत्रीय पक्षी या
पुस्तकात अशा ५०
पक्ष्यांची नोंद
आढळते. पण बीएनएचएसच्या
संशोधकांना अभ्यासातून, एकुण ७९ विशिष्ट
क्षेत्रीय पक्षी आढळून आले.
विशिष्ट क्षेत्रीय पक्षी असण्याची परिमाणे:
१. एखाद्या प्रजातीचं फ़क्त भारतातच आढळणारं
वास्तव्य.
२. एखाद्या प्रजातीच्या एकुण संख्येपैकी
खूप मोठ्या संख्येचा भारतात आढळ.
३. विशिष्ट क्षेत्रीय बेटांवरील पक्षी -
जे पक्षी फ़क्त अन्दमान आणि निकोबार
बेटांपुरतेच मर्यादित
आढळतात त्यांना
इतरांपासून वेगळं मानलं जातं.
४. भटके आणि संदिग्ध अभिलेख - जे पक्षी
आगोदर कधीतरी पाकिस्तान आणि नेपाळ देशातून
भारतात आले होते किंवा जे त्या देशात आढळत
होते पण आता नष्ट झाले आहेत असे पक्षी.
विशिष्ट क्षेत्रीय पक्षी स्थळे:
भारतातील खालील नमूद केलेल्या भूभागात
बहुतांश क्षेत्रीय पक्षी आढळतात.
१. अन्दमान बेटे,
२. आसामचा गवताळी प्रदेश,
३. मध्य भारतातील वने,
४. पूर्व आंध्र प्रदेश,
५. निकोबार बेटे,
६. दक्षिणचे दख्खन पठार,
७. पश्चिम घाट,
८. पश्चिम हिमालय.
विशिष्ट क्षेत्रीय पक्षी संवर्धन:
विशिष्ट क्षेत्रीय पक्षी हे एखाद्या
मर्यादित क्षेत्रीय भौगोलिक रांगामध्ये आणि
अतिशय छोट्या संख्येत अस्तित्वात असल्याने,
त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे ही एक
काळाची गरज आहे. ७९ पैकी पक्ष्यांच्या १८
प्रजाती या संकटग्रस्त पक्ष्यांच्या यादीत
मोडतात.
१. लुप्त होण्याच्या समीप असलेले -
३
२. लुप्त होण्याच्या मार्गावर असलेले
- १
३. लुप्त होण्याचा धोका असलेले - १४
४. ज्यांच्याबद्दल पुरेशी माहिती
नाही असे - ३
५. जवळजवळ संकटग्रस्त - १३
६. कमी काळजी करण्यासारखे - २७
७. ज्यांच्यावर योग्य संशोधन होणे
गरजेचे आहे असे पक्षी - १६
Abbreviations used
in the text
SR
– split within region
SE
– split from
extralimital species
RR
– relocation of race
CR
-
Critically Endangered
EN
- Endangered
VU
- Vulnerable
NT
- Near Threatended
LC
- Least Concern
RV
- Status
Revision Required
Synopsis No.
– A synopsis of the birds of India
and Pakistan together with those of Nepal,
Sikkim, Bhutan and Ceylon. Ripley, S.
D. (1961)
HBI
– Handbook of the Birds of India and
Pakistan. Compact Edition. Vol. 1-10.
Ali, S. A. and S. D. Ripley (1983)
BIS
– Birds of the
Indian Subcontinent. Grimmet, R., C.
Inskipp and T. Inskipp (1998)
TBOI
– The Birds of India, Sri Lanka,
Pakistan, Bhutan, Bangladesh and the
Maldives. Kazmierczak, K. and van
Perlo, B. (2000)
Reference:
Jathar,
G.S. & A.R. Rahmani, (2006). Endemic
Birds of India.
Buceros
Vol.
11 (2&3): 53 pp.