IUCN (International Union for Conservation
of Nature) म्हणजेच जागतिक निसर्ग संवर्धन संघ सर्व प्रकारच्या प्रजातींचे
वर्गीकरण करते तर बर्ड़लाईफ़ इंटरनॅशनल ही संकटग्रस्त पक्ष्यांचे वर्गीकरण
करणारी संस्था आहे.
भारतातील
संकटग्रस्त पक्ष्यांचे वर्गीकरण आणि त्यांची मानके
१. लुप्त
होण्याच्या समीप असलेले
Critically
Endangered
(CR):
Click here to see the details of the birds under this category
जेव्हा एखादी वन्य प्रजात नजिकच्या काळात त्यांच्या नैसर्गिक
अधिवासात नष्ट होण्याची दाट शक्यता असते आणि जी प्रजात खालील मापदंड पार
करते त्या पक्षी प्रजातीला या यादीत समाविष्ट केले जाते:
A - ज्यांच्या संख्येत मागच्या दहा वर्षात किंवा मागच्या ३ पिढ्यात ८०%
पेक्षा जास्त घट आढळून आली असल्यास.
B - ज्या प्रजातींचे पक्षी अंदाजे १०० चौकिमी पेक्षा कमी क्षेत्रफ़ळातच
आढळून येतात किंवा, ज्यांचा वावर अंदाजे १० चौकिमी इतक्या मर्यादित भागातच
आढळतो असे पक्षी.
C - ज्यांची संख्या २५० किंवा त्यापेक्षा कमी प्रौढ पक्षी अशी राहिली असेल
तर.
D - काही गणीतीय पृथक्करर्णानुसार येत्या दहा वर्षात किंवा पुढच्या ३
पिढ्यात जवळ्जवळ ५०% किंवा त्यापेक्षा जास्त पक्षी त्यांच्या नैसर्गिक
अधिवासात नष्ट होणार असतील तर.
२. लुप्त
होण्याच्या मार्गावर असलेले
Endangered
(EN):
Click
here to see the details of the birds under this category
जे पक्षी नजिकच्या काळात त्यांच्या नैसर्गिक अधिवासात लगेच नष्ट
होणार नस्तील पण पुढच्या काळात ते पक्षी लुप्त होण्याची शक्यता असते आणि
ज्या पक्ष्याची प्रजाती खालील मापदंड पार करते असे पक्षी या यादीत समाविष्ट
केले आहेत:
A - ज्यांच्या संख्येत मागच्या दहा वर्षात किंवा मागच्या ३ पिढ्यात ५०%
पेक्षा जास्त घट आढळून आली असल्यास.
B - ज्या प्रजातींचे पक्षी अंदाजे ५,००० चौकिमी पेक्षा कमी क्षेत्रफ़ळातच
आढळून येतात किंवा, ज्यांचा वावर अंदाजे ५०० चौकिमी इतक्या मर्यादित भागातच
आढळतो असे पक्षी.
C - ज्यांची संख्या २,५०० किंवा त्यापेक्षा कमी प्रौढ पक्षी अशी राहिली
असेल तर.
D - काही गणीतीय पृथक्करर्णानुसार येत्या दहा वर्षात किंवा पुढच्या ५
पिढ्यात जवळ्जवळ २०% किंवा त्यापेक्षा जास्त पक्षी त्यांच्या नैसर्गिक
अधिवासात नष्ट होणार असतील तर.
३. लुप्त होण्याचा
धोका असलेले
Vulnerable
(VU):
Click
here to see the details of the birds under this category
ज्या प्रजाती त्यांच्या नैसर्गिक अधिवासात लुप्त होण्याच्या
समीप नाहीत तसेच लुप्त होण्याच्या मार्गावरही नाहीत पण नजिकच्या काळात
त्यांना लुप्त होण्याचा धोका संभवतो अशा पक्ष्यांचा गट आणि ज्या पक्ष्याची
प्रजाती खालील मापदंड पार करते असे पक्षी या यादीत समाविष्ट केले आहेत:
A - ज्यांच्या संख्येत मागच्या दहा वर्षात किंवा मागच्या ३ पिढ्यात २०%
पेक्षा जास्त घट आढळून आली असल्यास.
B - ज्या प्रजातींचे पक्षी अंदाजे २०,००० चौकिमी पेक्षा कमी क्षेत्रफ़ळातच
आढळून येतात किंवा, ज्यांचा वावर अंदाजे २००० चौकिमी इतक्या मर्यादित
भागातच आढळतो असे पक्षी.
C - ज्यांची संख्या १०,००० किंवा त्यापेक्षा कमी प्रौढ पक्षी अशी राहिली
असेल तर.
D - काही गणीतीय पृथक्करर्णानुसार येत्या १०० वर्षात जवळ्जवळ १०% किंवा
त्यापेक्षा जास्त पक्षी त्यांच्या नैसर्गिक अधिवासात नष्ट होणार असतील तर.
४. न्यूनतम धोका
असलेले
Lower Risk
(LR):
Click here to see the details of the birds under this category
जे पक्षी वरच्या तीन्ही गटांचे मापदंड पर करत नाहीत पण वेळीच
लक्ष नाही दिले तर वरीलपैकी एखाद्या गटात जाण्याची संभावना असते. ह्या गटाचे
खालील प्रमाणे उपघट आहेत:
A - संवर्धनावर अवलंबित असलेले
Conservation Dependent (CD)
- ज्या पक्ष्यांच्या
अधिवासासंबंधित संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असते आणि जे पक्षी पुढच्या ५
वर्षात अशी पावले न टाकल्यास तो गट वरीलपैकी एखाद्या गटात पोचण्याची शक्याता
असते.
B - जवळजवळ संकटग्रस्त असलेले
Near Threatened (NT)
- जे पक्षी संवर्धन कार्यक्रमावर
अवलंबित नाहीत पण तरीही ज्यांना नष्ट होण्याचा धोका आहे, असे.
५. अपुरी माहिती असलेले
Data
Deficient
(DD):
Click here to see the details of the birds under this category
ज्या पक्ष्यांबद्दल फ़क्त काही जुजबीच महिती आहे पण त्यांचा वावर,
आढळ आणि संख्या ह्या घटकांबद्दल अजूनही संभ्रम आहे आणि ह्याबद्दल परिपूर्ण
महिती मिळवणे अत्यंत गरजेजे आहे, असे पक्षी.
६. मुल्यांकन न
झालेले
Not
Evaluated
(NE):
ज्या प्रजातींची वरीलप्रमाणे प्रमाणसिद्धता झालेले नाही, असे
पक्षी.
Dendrogram
Recommended citation:
Islam, M. Z. and Rahmani, A. R. (2002) Threatened Birds of India. Buceros
Vol. 7, No. 1 & 2, 2002. Compiled from Threatened Birds of Asia. Birdlife
International Red Data Book (2001). Cambridge, U.K.: BirdLife
International